सिन्देवाही (Chadrapur) :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रात येत असलेल्या धुमनखेडा गावात बिबट्याने (leopard) आज शनिवार दि. ८ फेब्रुवारी ला धुमाकूळ माजविला असून घरात घुसून अनेकांना जखमी केल्याने नागरीकात दहशत निर्माण झाली आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न
दुपारच्या सुमारास शेतात लाख खोदणाऱ्या जयश्री रवि शेन्डे या महिलेला जखमी करून वाघाने लगतच असलेल्या कुसनदास मेश्राम यांच्या गोठ्यात बस्तान मांडले आणि लगतच असलेल्या देवानंद बन्सोड यांच्या घरी जाऊन सुषमा देवानंद बन्सोड ह्या महिलेला आणि पती देवानंद सितकुरा बन्सोड यांना जखमी केले त्याच प्रमाणे घरी उभा असलेल्या चंद्रभान पांडूरंग बन्सोड ह्याला जखमी करून मेश्राम यांच्या गोठ्यात बस्तान मांडले . सदर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने रेस्क्यु आपरेशन(Rescue cognition by wood department) दुपारला सुरू केले असता रेस्क्यु सुरू असतांना नितेश सहारे नामक वनरक्षकाला जखमी केल्याने खुपच दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने गोठ्यात बस्तान मांडल्याने त्याला बघण्यासाठी नागरीकांना खुपच गर्दी केली.
नागरीक घराघरावरून बिबट्या चा रेस्क्यु दुपारपासून सायंकाळ पर्यंत बघत होते . पोलीस विभागाने सुरेक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता त्यासाठी पोलीस निरीक्षक विजय राठोड घटना स्थळी हजर होते .यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात वनविभाची चमु बिबट्याचे रेस्क्यु करण्यासाठी आणि रेस्क्यु करीत असतांना कुनाला इजा होवू नये म्हणून घरा घरावर जाळी लावून घर सिल केले.