Chandrapur :- वरोरा दिनांक 3 फेब्रुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लहान पासून स्वयंसेवक असलेले श्रीकृष्ण देवराव घड्याळपाटील यांचे वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराने (Heart disease) सोमवार ला पहाटे ५ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले.
सोमवार ला पहाटे ५ वाजता दरम्यान दुःखद निधन
श्रीकृष्ण घड्याळपाटील यांचा किसान संघाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा होता. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना १८ महिन्याचा कारावास सुद्धा झालेला होता. १९८६ पासून ते लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २०२२ पासून तर आजतागायत ते संस्थेचे उपाध्यक्ष होते. उत्तम वक्ता, अभ्यासक, लेखक, भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक होता.
त्यांच्या पश्चात एक कन्या, दोन जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर वरोरा येथील स्मशानभूमीमध्ये मंगळवार दि ४ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.