नगरसुल : खरवंडी मतदान केंद्रात स्थानिकांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांची उडालेली शाब्दीक चकमक. (छाया : भाऊलाल कुडके)
Published on
:
21 Nov 2024, 4:50 am
Updated on
:
21 Nov 2024, 4:50 am
नगरसुल : येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेटी देत असताना महायुतीचे उमेदवार, मंत्री छगन भुजबळ यांनी खरवंडी गावातील केंद्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. त्यातून गदारोळ झाला. त्यात भुजबळ आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
मी उमेदवार आहे, मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार आहे, असे भुजबळांचे सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी बस झाले वीस वर्षे. आमदार राहीले आता तरी शांत बसा. बोलो रे माणिकभाऊंना.. अशा सूर आळवल्याने गोंधळ उडाला. अखेर भुजबळ यांनी केंद्र सोडल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली.