Zomato चे CEO म्हणतात, 'चीफ ऑफ स्टाफच्या नोकरीसाठी माझ्याकडे १ हजार अर्ज'File Photo
Published on
:
21 Nov 2024, 8:54 am
Updated on
:
21 Nov 2024, 8:54 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: झोमॅटो (Zomato) या फूड डिलिव्हरी कंपनीचे CEO दीपंदर गोयल यांनी त्यांच्या कंपनीत 20 नोव्हेंबर रोजी चीफ ऑफ स्टाफ पदासाठी भरती करण्याची घोषणा केली. या पदासाठी त्यांना देशभरातून १० हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. तत्पूर्वी झोमॅटोच्या सीईओंना सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या या पदाच्या जाहीरातीमुळे टीकेचा सामना देखील करावा लागला असल्याचे 'इंडिया टुडे'ने वृत्तात म्हटले आहे.
नोकरी मिळाल्यानंतर द्यावे लागणार २० लाख रूपये
झोमॅटो कंपनीने त्यांच्या गुरुग्राम मुख्यालयासाठी स्वत: सीईओने चीफ ऑफ स्टाफ पदासाठी सोशल जाहीरात प्रसिद्ध केली. या जाहीरातीमध्ये कंपनीने "उमेदवाराला पहिल्या वर्षी एक रूपया देखील पगार देण्यात येणार नव्हता, तर निवड होणाऱ्या उमेदवारानेच कंपनीला २० लाख रूपये इतकी मोठी फी देणे आवश्यक" असल्याचे म्हटले होते. तसेच आज सायंकाळी ६ वाजता अर्ज प्रक्रिया बंद होणार असल्याचे देखील कंपनीच्या CEO ने म्हटले आहे. झोमॅटो कंपनीच्या या असामान्य जाहीर आणि त्यातील अटींमुळे सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Update 2: we have over 10,000 applications, a lot of them well thought through, mixed between -
1. Those who have all the money
2. Those who have some of the money
3. Those who say they don’t have the money
4. Those who really don’t have the money
We will be closing the… https://t.co/8a6XhgeOGk
— Deepinder Goyal (@deepigoyal) November 21, 2024'भूक', 'सहानुभूती' आणि 'सामान्य ज्ञान' असलेल्यांसाठी आदर्श जाहीरात
झोमॅटो दीपंदर गोयल यांनी बुधवारी (दि.२०) त्यांच्या X अकाऊंटवरून नोकरीसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. यामध्ये निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता निकष आणि जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला होता. तसेच 'भूक', 'सहानुभूती' आणि 'सामान्य ज्ञान' असलेल्या व्यक्तीसाठी ही जाहीरात आदर्श असल्याचे वर्णन केले होते. परंतु यामध्ये कोणताही पूर्व अनुभव किंवा केलंच पाहिजे अशी भावना नसल्याचे कंपनी 'CEO'नी म्हटले होते.
नोकरीची ही ऑफर "शोषणात्मक"; नेटकऱ्यांची टीका
पहिल्या वर्षाच्या शेवटापर्यंत याठिकाणी कोण्त्याही प्रकारे गुंतवणूक न करता उमेदवाराच्या पसंतीच्या कोणत्याही धर्मादाय संस्थेला ५० लाख रुपये देण्याचे वचन कंपनीकडून देण्यात आले आहे. ही रक्कम अशा पदासाठी नेहमीच्या पगाराच्या समतुल्य आहे. दुसऱ्या वर्षापासून, निवडलेल्या उमेदवाराला वार्षिक 50 लाख रुपयांपेक्षा जास्त स्पर्धात्मक पगार मिळेल, असे देखील कंपनीने म्हटले आहे. झोमॅटोचे सीईओ गोयल यांची पोस्ट व्हायरल होताच, सोशल मीडिया युजर्संनी नोकरीची ही ऑफर "शोषणात्मक" असल्याचे म्हणत निंदा केली आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी टिप्पणी केली आहे की, ही खूप "वाईट कल्पना" आहे शिवाय काहीच नसल्याचे देखील म्हटले आहे.