मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर आहे. तर काही ठिकाणी अपक्षांना देखील 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान काल, बुधवारी पार पडले. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर आहे. तर काही ठिकाणी अपक्षांना देखील 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशातच एक्झिट पोलनंतर भारतीय जनता पक्ष आता अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. जिंकण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर नेत्यांना भाजपचे नेते संपर्क साधणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासह भापजच्या विजयी बंडखोरांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, जिंकण्याची शक्यता आसणाऱ्या बंडखोर नेत्यांना संपर्क साधण्याची जबाबदारी त्या-त्या विभागातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर असणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, समोर आलेल्या विविध संस्थाच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याचा अंदाज आहे. तर पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
Published on: Nov 21, 2024 02:26 PM