लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत अधिक मतदान:पुणे जिल्ह्यात 7 लाख 93 हजार 342 जास्त मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

4 hours ago 1
पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत एकूण ६१.०५ टक्के मतदान झाले. लोकसभेला पुणे जिल्ह्यात ५५.५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला ५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. लोकसभेच्या तुलनेत ७ लाख ९३ हजार ३४२ इतक्या जास्त मतदारांनी विधानसभेला मतदानाचा हक्क बजावला. काही मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी मतदान वाढले तर काही मतदारसंघात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झालेले तीन मतदारसंघ असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. दिवसे म्हणाले, विधानसभा निवडणूकीत पुण्यात मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. एकही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. तसेच दरवेळी मतदान यादीतील घोळ, मतदान यंत्रातील बिघाड यांसारख्या तक्रारी आल्या नाहीत. मावळ, दौंड, भोसरी, जून्नर, खेड-आळंदी आणि शिरूर मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत १० टक्के जास्त मतदान झाले आहे. तसेच इंदापूर, भोर, आंबेगाव, खडकवासला, पुरंदर आणि चिंचवड या मतदारसंघात ५ टक्के किंवा त्याहून अधिक मतदान झाले. तर कसबा, कोथरूड, कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाले. प्रामुख्याने दुपारी ४ वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढला. मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. वेळ संपली तरी ग्रामीण भागातील १०० पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर शहरी भागातील ३५ ते ४० मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागात रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. शहरी भागात रात्री ७ ते ७.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. लोकसभेनंतर मतदारनोंदणी अभियानाद्वारे ५ लाख १३ हजार ८४३ नवमतदारांची नोंद झाली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article