Cricket : अजिंक्य रहाणे याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी; शार्दुल श्रेयसलाही संघात स्थान!

1 hour ago 2

Ajinkya Rahane Captaincy: भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या मुंबईकर त्रिकुटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

 अजिंक्य रहाणे याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी; शार्दुल श्रेयसलाही संघात स्थान!

ajinkya rahane squad indiaImage Credit source: Icc X Account

| Updated on: Sep 23, 2024 | 4:55 PM

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार राहिलेला अजिंक्य रहाणे पुनरागमनासाठी झगडतोय. तसेच श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकुर हे दोघे मुंबईकर खेळाडूही टीम इंडियापासून दूर आहेत. या तिघांना भारतीय संघात पुनरागमनाचे वेध लागलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी इराणी कप 2024 स्पर्धेत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. तसेच रहाणेच्या नेतृत्वात श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकुर ही जोडीही खेळणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article