Crime News : चोर्‍यांसाठी चिखली परिसर हॉटस्पॉट

2 hours ago 1
संतोष शिंदे

Published on

31 Jan 2025, 1:07 pm

Updated on

31 Jan 2025, 1:07 pm

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये 89 घटनांची घट झाली असली, तरी काही पोलिस ठाणी अजूनही चोरट्यांसाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 144 चोरीच्या घटना घडल्या. येथे मोठ्या प्रमाणावर भंगार दुकाने आणि अनधिकृत वर्कशॉप्स असल्याने चोरीची वाहने सहज विकली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

या भागात चोरीची वाहने तुकडे करून सुटे भाग म्हणून विकले जातात. विशेषतः इंजिन आणि चेसिस नंबर गायब करून ती सेकंड-हँड मार्केटमध्ये विकली जातात, त्यामुळे चोरी पकडणे कठीण होते. अनधिकृत वर्कशॉप्स आणि भंगार दुकाने चोरट्यांसाठी ‘सेफ झोन’ बनली असून, वाहने स्क्रॅपमध्ये विकली जातात किंवा त्यांचे पार्ट्स बदलले जात असल्याचा संशय आहे.

गुन्ह्यांची स्थिती

2023: 1,353

2024: 1,264 (-89 घट)

उकल प्रमाण

2023: 40%

2024: 38%

वाहनचोरी रोखण्यासाठी सरकारने भंगार व्यवसायाला अधिकृत परवाना अनिवार्य करणे, प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणे, चोरीच्या मालाची विक्री टाळण्यासाठी कठोर कारवाई करणे यांसारखे उपाय योजले पाहिजेत. वाहन चोरी रोखण्यासाठी प्रत्येक वाहनाच्या भागांची ट्रॅकिंग व्यवस्था असावी आणि स्क्रॅपिंगसाठी फक्त अधिकृत केंद्रांनाच परवानगी द्यावी. जर या समस्या नियंत्रणात आणल्या नाहीत, तर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची आणि आगामी काळात कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

परिमंडळ 1 : 518 वरून 408 (-110)

परिमंडळ 2 : 402 वरून 343 (-59)

परिमंडळ 3 : 433 वरून 513 (+80)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article