Kondhali Murder Case: पत्नीची लाथ पतीवर पडली भारी; पत्नीच्या लाथीने पतीचा मृत्यू

2 hours ago 1

कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत हॉटेल संग्राम येथील घटना

नागपूर () : पोलिस स्टेशन कोंढाळी अंतर्गत येणाऱ्या रिंगणाबोडी शिवारातील अगदी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हॉटेल संग्राममध्ये कामावर असलेल्या पति पत्नीमध्ये रात्री झालेल्या कडाक्याच्या भांडणात पत्नीची लाथ पतीच्या छाताडावर पडताच (Kondhali Murder Case) पती यमसदनी पोहोचल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील रिंगणाबोडी शिवारातील महामार्गाला अगदी लागून असलेल्या हॉटेल संग्राममध्ये मागील अनेक वर्षांपासून माधव रामराव जाधव (34) व संध्या उर्फ सुरेखा जाधव (30) दोन्ही हॉटेल संग्राममध्ये कामावर होते. पतीचे दारूचे व्यसनाधीनते पायी माधव रामराव जाधव व त्यांच्या पत्नी संध्यामध्ये दारूवरून नेहमी वाद होत होते. या (Kondhali Murder Case) वादांमुळे माधव जाधव हा हॉटेल संग्राम ऐवजी अन्य हाटेलमध्ये कामावर जात होता.

पती पत्नीमध्ये सततचे वादाचा परिणाम मुलांवर होत होता. करिता माधव रामराव जाधवची आई हाटेलचे कॉर्टरवर येऊन आपला मुलागा व सुनेला समझोता करून 29 जानेवारीला परत आपल्या गावी निघून गेली. मात्र 30 जानेवारीला रामराव जाधव पुन्हा दारूचे नशेत घरी आला. यातूनच परत पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या (Kondhali Murder Case) भांडणात पत्नी संध्या उर्फ सुरेखाची लाथ माधवचे छातीत बसली व माधवचा मृत्यू झाला.

या (Kondhali Murder Case) घटनेची माहिती संग्राम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संगीता महेश मसराम यांनी या घटनेची फिर्याद कोंढाळी पोलीस स्टेशनला दिली. (Kondhali Police) घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व ऑन डिवटी स्टाफ पो उ नि धवल देशमुख, रोषण खांडेकर, हेड कॉन्स्टेबल मनोज आगरकर, म. पो ना. उषा शेरेकर घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळ पंचनामा केल्यावर मृतकाचे शव विच्छेदनास ग्रामीण रूग्णालय काटोलला पाठविले. तर महिलेला पोलीसांनी अप क्रं -43/2025अंतरगत बी.एन.एस चे कलम 103(1)अन्वये ताब्यात घेतले आहे.

पति पत्नीच्या भांडणात (Kondhali Murder Case) माधव रामराव जाधवचा मृत्यू तर पत्नी संध्या उर्फ सुरेखा जाधव ही हत्याप्रकरणी (Kondhali Police) पोलिसांच्या अटकेत असल्याने साडे पाच व चार वर्षिय असे दोन अपत्ये सध्या तरी पोरके झाले आहेत. कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी पुढिल तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article