2019 मध्ये शरद पवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवले. त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आले, असा दावाही फडणवीसांनी केलाय
शरद पवारांच्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापन कऱण्याचं ठरलं. इतकंच नाहीतर हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मोठा दावा या मुलाखतीत केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे 2019 मध्ये शरद पवार यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवले. त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमित शाह, शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल एकत्र एका बैठकीला उपस्थित होते. त्याच बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय. तर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली, सरकार स्थापन करणार असल्याचे त्यांनी मला सांगितले. राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी, मग सरकार स्थापन करू, असं बैठकीत ठरल्याचे देवेंद्र फडणवीस मुलाखतीत म्हटले.
Published on: Nov 15, 2024 01:17 PM