Published on
:
15 Nov 2024, 8:56 am
Updated on
:
15 Nov 2024, 8:56 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - दिग्दर्शक तनवीर अहमद यांचे निधन झाले. १४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तनवीर अहमद यांनी चित्रपट आग आणि तूफानचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटांना अहमद नावाने क्रेडिट देण्यात आलं होतं. चित्रपटात मुमताज, रोबिन कुमार, अनवर हुसैन, मोहन चोटीहे कलाकार होते. हा चित्रपट १९७५ मध्ये रिलीज झाला होता.
अदा- अ वे ऑफ लाईफ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. तो चित्रपट २०१० मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात राहुल रॉय, आयशा जुल्का, मिलिंद गुनाजी, अयान अहमद या कलाकारांच्या भूमिका होत्या.
आग, तूफान या चित्रपटानंतर ६ वर्षांनी १९८१ मध्ये त्यांनी चिरुथा नावाचा चित्रपट आणला. त्यामध्ये अभिनेत्री दीप्ती नवल मुख्य भूमिकेत होत्या. इनायतुल्लाह कांट्रो, सुलभा देशपांडे, सुधीर दळवी हे कलाकार देखील होते. पुढे सुराज (१९८७) आणि आकर्षण (१९८८) नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दीर्घकाळानंतर महात्मा १९९८ मध्ये चित्रपट आणला. डिंपल घोष, सदाश खान आणि गौरी घोपकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.