रिसोड (Election Counting) : दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रिसोड येथील तहसील कार्यालयांमध्ये रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासने सर्व तयारी पूर्ण केली असून तहसील परिसरात पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार असून मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी येथील प्रथम मतमोजणी सुरू होणार असून रिसोड तालुक्यातील मोहजाबंदी या गावातील अंतिम बूथवरील मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीची सुरुवात सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाणार असून यानंतर ईव्हीएम मशीन मधील (Election Counting) मतदान मोजल्या जाणार आहे. याकरिता रिसोड तहसील कार्यालयामध्ये 14 टेबल लावण्यात आले असून एकूण 25 फेऱ्यांमध्ये सर्व मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. रिसोड मालेगांव मतदारसंघांमध्ये 70.36% मतदान झाले असून सदर मतदान रिसोड मालेगाव मतदारसंघात 350 मतदान केंद्रावर घेण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या निगराणीत मतमोजणी होणार असून निवडणूक प्रशासन यासाठी सज्ज आहे.
तहसील कार्यालयामध्ये रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील झालेल्या मतदानाचे (Election Counting) ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रुम मध्ये ठेवण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत तहसील कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले असून, कानाकोपऱ्यात पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तहसील कार्यालय मध्ये आत प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची कसून विचारपूस केली जात आहे तर, ओळखपत्र असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आत जाऊ दिल्या जात नाही.