पोटगाव (Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील ज्ञानदीप बहु. शिक्षण प्रसारक मंडळ पोटगाव द्वारा संचालित येथील इंपेरियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज पोटगाव यांच्या विद्यमाने आज दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान (Voting) जनजागृती व मतदान टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली.
मतदान जनजागृती व मतदान टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी
नागरिकांनी आपल्या संविधानाने अनुच्छेद ३२६ नुसार दिलेला मतदानाचा अधिकार व कर्तव्य भावनेने बजावावा यासाठी मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवणे गरजेचे आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडून गावात प्रत्येक गलीतून जनजागृती करण्यात आली तसेच मतदान घोषवाक्य देऊन मोठ्या उत्साहात मतदारांना तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाचे महत्व पटवून देऊन मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित गावातील नागरिक तसेच शाळेचे शिक्षक श्री. देवेंद्र नाकाडे सर, चेतन हुमने सर, जागृती कुरुडकर मॅडम, सौ. अश्विनी बनसोड मॅडम, शुभांगी दिघोरे मॅडम, वर्षा वंजारी मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंकज वंजारी सर व मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.