शंभुराज देसाईंनी पाटणमध्ये उद्योग का आणले नाही?:त्यांनी पदाचा गैरवापर केला, सत्ता आली सगळी प्रकरण मार्गी लावतो- उद्धव ठाकरे

2 hours ago 1
शंभुराज देसाई यांनी पाटणमध्ये उद्योग का आणले नाही?, त्यांना विचारा. या लोकांना मी सर्व काही दिले पण यांनी पदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले. त्यांनी मविआ सरकार का पाडले हे विचारा असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटणच्या सभेतून शंभुराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. थांबा सत्ता आल्यानंतर ही सर्व प्रकरणे कशी मार्गी लावतो, ते पाहा. एकनाथ शिंदेंना माहिती आहे की भाजप त्यांचा वापर करुन घेणार आहे. त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे आहे, म्हणून 171 जागांवर भाजपचे उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेनेची कमळाबाई होईल असे बाळासाहेब म्हणाले होते का? उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे. त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला आहे. त्यात बाळासाहेबांचे एक वाक्य लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. मग शिवसेनेची कमळाबाई होईल, असे बाळासाहेब म्हणाले होते का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधला आहे. ते माझ्या मनाला लागले उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र भिकारी झाला पाहिजे आणि भिकेचा वाडगा घेऊन माझ्यासमोर उभा राहिला पाहिजे, लाचार झाला पाहिजे असे मोदी-शहा यांचे कारस्थान आहे. या कारस्थानाला महाराष्ट्र बळी पडणार नाही. त्यांची मला नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल गेली. 2019 पर्यंत मी त्यांच्यासाठी व्यवस्थित होतो. मला त्यांनी हे म्हटले आहे हे जिव्हारी नक्कीच लागलं आहे कारण त्यांनी माझ्या आई वडिलांचा अपमान केला आहे. मला नकली संतान म्हणता, तुमची लायकी काय? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. ..तर राज ठाकरेंशी युती होऊ शकत नाही उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या वडिलांनी शिवसेना या पक्षाची स्थापना शेतकऱ्यांना, भूमीपुत्रांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी केली. महाराष्ट्राच्या लुटारुंना खुर्ची मिळवून देण्यासाठी नाही केली. महाराष्ट्राचे लुटारु नकोत. राज ठाकरेंनी तर जाहीर केले आहे कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचा लुटारु मुख्यमंत्री होणार असेल आणि त्यांना त्यांचा पाठिंबा असेल तर माझी युती होऊ शकत नाही. मी माझ्या महाराष्ट्राशी बांधील आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article