धडगाव येथील आदिवसी मतदारांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 11:36 am
Updated on
:
17 Nov 2024, 11:36 am
नंदूरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क - येथील दुर्गम भाग धडगाव येथी मुख्यमंत्री यांच्या सभेला चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. आमदार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदूरबार धडगाव येथील दुर्गम भागात प्रचार सभा पार पाडली. पाडवी यांचा विजय निश्चित असून येथील मतदारांशी त्यांनी आदिवासी भाषेतून संवाद साधत प्रचारसभेला सुरुवात केली. तुमच्या हातातील शक्ती ओळखून तुम्ही भल्या भल्यांना आडवे पाडू शकतात. रानावनातील, गोरगरीबांसोबत भाकर खाणारा असा आमचा उमेदवार पाडवी आहेत, त्यामुळे येथील आमदार आमशा पाडवी हेच फिक्स आमदार आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री आज रविवार (दि.17) रोजी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे जाहीर सभा झाली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्यासाठी मुख्यमंत्री यांची ही जाहीर सभा पार पडली.
तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात दहिवेल या गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. शिवसेनेच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांच्या प्रचारासाठी साक्री इयेथील दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी मोठा शामियाना, मंडप आणि 25000 नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.