राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील File Photo
Published on
:
17 Nov 2024, 1:45 pm
Updated on
:
17 Nov 2024, 1:45 pm
भंडारा: विश्वासघात करून राज्यात सरकार स्थापनेचे काम या महायुतीच्या नेत्यांनी केले आहे. मात्र ही गोष्ट राज्यातील जनतेला मान्य नसल्याचे जनतेनी लोकसभा निवडणुकीतून दाखवून दिले आहे. आता राज्यातील सरकार घालविण्याची वेळ आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मविआला मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार ही काळया दगडावरची रेष आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीत यांनी व्यक्त केला.तुमसर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर येथे आयोजित प्रचार सभेत ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यातील व केंद्र सरकार हे धनाढ्यांच्या हिताचे असून सर्वसामान्य व गोरगरिबांना लुटणारे आहे. आज गोरगरिब व सर्वसामान्य माणूस महागाईच्या आगीत होरपळत असतांना त्यांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार श्रीमंतांना कसा दिलासा देता येईल यासाठी सतत काम करीत आहे. २१ ते ३५ वर्षे वयोगटातील ३० टक्के तरूणांना आज बेरोजगारीचा सामना करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलविले. नागपूर येथील मिहानमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला पळविला. १ लाख लोकांना रोजगार देणारा राज्यातील फॉक्सकॉन प्रकल्प हा सुध्दा महाराष्ट्राबाहेर पळविला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातचे पालकत्व स्विकारले आहे का? अशी टिकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.