Gangakhed crime: अबब…वॉकिंगसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर काठी हल्ला

2 hours ago 1

दोन अनोळखी इसमांविरुद्ध परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी/गंगाखेड (Gangakhed crime) : सायंकाळच्या वेळेला वॉकिंगसाठी घराबाहेर पडलेल्या ३५ वर्षीय महिलेवर दोन अनोळखी इसमांनी काठीने हल्ला केल्याची घटना रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील व्यंकटेश नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी (Gangakhed crime) गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला वर्गात मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगर येथील रहिवासी प्रतिभा ज्ञानोबा घाडगे वय ३५ वर्ष या नेहमी प्रमाणे रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर वॉकिंगसाठी घराबाहेर पडल्या असता घरासमोरील मैदानात असलेल्या झाडा झुडपामध्ये लपून बसलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने पळ पळ ही तीच आहे. असे दुसऱ्या अनोळखी इसमास म्हटले तेंव्हा हातात काठी घेऊन तो इसम फिर्यादी महिलेच्या पाठीमागे पळत आला. त्यास घाबरून प्रतिभा घाडगे या पळत असतांना त्या अनोळखी इसमाने काठीने त्यांच्या पाठीत मारून मुक्का मार दिला.

घाबरलेल्या अवस्थेत प्रतिभा घाडगे यांनी आरडा ओरडा केल्यामुळे त्यांची भावजय कोमल रवि घाडगे व शेजारी दिपक अरबाड हे धावत आले तोपर्यंत दोन्ही अनोळखी इसमांनी पळ काढला. दिपक अरबाड यांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नसल्याची फिर्याद प्रतिभा घाडगे यांनी सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दसरा व नवरात्र महोत्सव सुरू असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अगदी घरापासून जवळच महिलेवर घडलेल्या या काठी हल्ल्याच्या घटनेमुळे व्यंकटेश नगर परिसरासह शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेवर काठी हल्ला करणाऱ्या अनोळखी इसमांचा (Gangakhed crime) पोलीसांनी तात्काळ शोध घेऊन ताब्यात घ्यावे तसेच शहरात पोलीसांची गस्त वाढवून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही शहर वासीयांतून केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article