अमेरिकेतील वादानंतर गौतम अदानी यांचा अदानी समूह मोठ्या अडचणीत सापडला. राज्य वितरण कंपन्यांसोबत सौर ऊर्जा करार करण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना कथित 2,110 कोटी रुपयांची लाच दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर एकच वादळ उठले. ही लाच 2020 ते 2024 या काळात देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वादाळाचं मोहळ उठल्यानंतर अदानी समूहाने या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व आरोप निराधार आणि धादांत खोटे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. इतकेच नाही तर कंपनीने अमेरिकेतील एका मोठ्या गुंतवणुकीला ब्रेक लावला आहे.
अदानी समूहाची प्रतिक्रिया काय?
अदानी ग्रीनच्या संचालकांविरोधात अमेरिकेतील न्याय विभाग आणि अमेरिकेतील सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने गंभीर आरोप केले. हे आरोप निराधार असल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे. फियार्दी पक्षाने आरोप लावले असले तरी ते केवळ आरोप आहेत. जोपर्यंत हे आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत प्रतिवादी हा निर्दोष असतो, अशी बाजू मांडण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
याप्रकरणी आता कायदेशीर लढा देण्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले. अदानी समूह हा पारदर्शकता आणि नियमानुसार काम करत असल्याचे कंपनीने सांगीतले. गुंतवणूकदार, हित जपणारे आणि भागीदारांना कंपनीने याप्रकरणी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनी सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि कायदे-नियमांचे पालन करतो असे आश्वासन देण्यात आले आहे.
या आरोपानंतर कंपनीचा मोठा निर्णय
अमेरिकेतील न्याय विभाग आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी, सागर अदानी आणि इतर संचालक, अधिकाऱ्यांविरोधात एक दिवाणी प्रकरण दाखल केले आहे. तर न्यूयॉर्क येथील पूर्व जिल्हा कोर्टात त्यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. तर अमेरिकेतील न्याय विभागाने संचालक मंडळातील सदस्य विनीत जैन यांच्याविरोधात फौजदारी आरोप दाखल करण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे आता अदानी समूहाने अमेरिकेतमधील 506925 कोटी 44 लाखांचा ( 600 दशलक्ष डॉलर) बाँड रद्द केला आहे. आता या प्रकरणावरून भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.