मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीची सुटका:25 हजाराच्या जातमुचलक्यावर चेतन पाटीलला जामीन मंजूर
3 hours ago
1
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील याला अटक करण्यात आली होती. त्यासोबत जयदीप आपटे यालाही अटक केली होती. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून मुंबई न्यायालयाने चेतन पाटील याला दिलासा दिला आहे. न्यायालयाने चेतन पाटील याला जामीन मंजूर केला असून जयदीप आपटे हा अद्यापही तुरुंगातच आहे. मुंबई न्यायालयाकडून दिलासा मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मुंबई न्यायायलयात सुनावणी पार पडली, त्यात चेतन पाटीलला दिलासा देत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्टमध्ये कोसळल्याप्रकरणी सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला अटक करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी अनावरण केल्याच्या जवळपास नऊ महिन्यांनंतर 26 ऑगस्ट रोजी प्रतिष्ठित मराठा योद्धा राजाचा 35 फुटांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळला होता. त्यानंतर, चेतन पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही, असे न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी सांगितले. याप्रकरणी, पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. दरम्यान, जयदीप आपटेने हा पुतळा बनवला होता, तर स्ट्रक्चरल डिझायनरसाठी चेतन पाटील यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यावरून राजकारणही करण्यात आले. विरोधकांनी या मुद्दयावरुन सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यापेक्षा मोठा आणि उत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तो मुद्दा चांगलाच गाजला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरुन महायुतीवर टीका केली. या संबंधित ही पण बातमी वाचा... छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण:मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील याला 13 सप्टेंबर पर्यंत कोठडी मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयाने आता 13 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वास्तविक आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन पाटील हा दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)