देशात निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सचे संरक्षण कसे केले जाते हे अनेकांना माहित नसेल. मतदानानंतर ईव्हीएम मशीन हे सील करून स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात आणि मतमोजणी होईपर्यंत ते तिथेच सुरक्षित असतात. मतदान केंद्रांवरून ईव्हीएम थेट स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात का? तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, मतदान संपल्यानंतर लगेचच मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पाठवले जात नाहीत.
मतदान संपल्यानंतर काय होते?
मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकारी ईव्हीएममधील मतांची नोंद तपासतात. मतदारांची संख्या आणि मतं याची संख्या जुळल्यानंतर मशीन सील केले जातात. या दरम्यान, सर्व उमेदवारांच्या पोलिंग एजंटला एक सत्यापित प्रत दिली जाते. जेव्हा सर्व ईव्हीएम येतात. त्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये सील केले जातात. उमेदवारांचे प्रतिनिधीही यावेळी ती सील तपासतात आणि त्यावर सही करतात.
स्ट्राँग रुम पर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. निवडणूक आयोग त्याच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सतर्क असते. निवडणूक आयोग तीन पातळ्यांवर स्ट्राँग रूमचे संरक्षण करतो. यासाठी निवडणूक आयोग आधीच तयारी करतो.
स्ट्राँग रूमची अंतर्गत सुरक्षा केंद्रीय निमलष्करी दलाकडे असते. याच्या आत आणखी एक सुरक्षा आहे, जी स्ट्राँग रूमच्या आत असते. जी केंद्रीय बलाद्वारे केले जाते. सर्वात बाहेरील सुरक्षा ही राज्य पोलीस दलांची जबाबदारी असते.
EVM जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी
जिल्ह्यात उपलब्ध सर्व ईव्हीएम जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO)च्या देखरेखीखाली असतात. ज्यामध्ये डबल लॉक सिस्टम आहे. त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तिथे तैनात असते. यासोबतच सीसीटीव्हीनेही पाळत ठेवण्यात येते.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून आता २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक निकालानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. ज्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहे. पण खरा निकाला हा शनिवारीच जाहीर होणार आहे.