मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत पोलिसांचेही योगदान
– सुधीर गोगटे
हिंगोली (Hingoli Assembly Election) : लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजवावा. यासाठी निवडणूक विभागाने जनजागृती केली होती. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. कायदा व सुव्यवस्था राखणार्याचे कर्तव्य बजावणार्या पोलिसांनी (Police Election Duty) सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र दिसून आले आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यास लावला हातभार
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची (Hingoli Assembly Election) टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागाने जोमाचे प्रयत्न करण्यात आले. त्या निमित्त यंदाच्या निवडणुकीत २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत टक्केवारी वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्हाभरात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी. या उद्देशाने जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सीएएफच्या दोन कंपन्या, एसएपीएफच्या दोन कंपन्या, अतिरीक्त एसएपीएफचे एक प्लॉटून, ९२७ पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या खांद्याला खांदा लावून ९६२ गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात हा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने तुरळक घटना वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
काही चिमुकल्यांचाही पोलिसांनी मतदान केंद्रावर केला सांभाळ
विशेष म्हणजे पोलीस अधिकारी (Police Election Duty) व कर्मचार्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी होती. अशावेळी अधिकारी व कर्मचार्यांनी आपापली जबाबदारी सक्षमपणे पेलावली. हिंगोली जिल्ह्यात एकूण १०२३ मतदान केंद्र होते. ज्यामध्ये शहरी भागात १६० व ग्रामीण भागात ८६३ मतदान केंद्रांचा समावेश होता. ज्यामध्ये (Hingoli Assembly Election) वसमत विधानसभा मतदार संघात एकूण ३२८ मतदान केंद्र ज्यामध्ये शहरी भागात ५२ तर ग्रामीण भागात २७६, कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण ३५२ मतदान केंद्र ज्यामध्ये शहरी भागात ३२ तर ग्रामीण भागात ३२०, हिंगोली विधानसभा मतदार संघात एकूण ३४३ मतदान केंद्र ज्यामध्ये शहरी भागात ७६ व ग्रामीण भागात २६७ मतदान केंद्राचा समावेश होता.
काही ठिकाणी वयोवृद्ध व दिव्यांग मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरीता आले असता, उपस्थित (Police Election Duty) पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी सामाजिक बांधिलकी राखून आलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याकरीता मदत केली. (Hingoli Assembly Election) काही वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना चालणे कठीण बनले होते अशावेळी उपस्थित पोलीस कर्मचार्यांनी चक्क दोन्ही हातांनी मतदारास उचलून मतदान केंद्रापर्यंत नेवून सोडले. यामुळेच हिंगोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ही टक्केवारी वाढण्याकरीता पोलिसांचेही मोठे योगदान ठरले आहे.