२ लाख ४० हजार ७३७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
वसमत (Wasmat Assembly Elections) : विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान झाले ७५.०५ज्ञ् मतदान झाले दोन लाख ४० हजार ७३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत वसमत विधानसभा मतदारसंघात मतदान वाढले आहेअत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या लढतीत कोण बाजी मारणार हे २३ तारखेच्या मोजणीनंतर समोर येणार आहे सर्वांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत.
वसमत विधानसभा मतदार संघातील (Wasmat Assembly Elections) निवडणुकीसाठी ३२८ मतदान केंद्रांवर अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या वातावरणात व शांततेत मतदान पार पडले. वसमत विधानसभा मतदारसंघात ३२७ मतदान केंद्र व एक सहाय्यककारी मतदानकेंद्र असे एकूण ३२८ केंद्रांवर मतदान पार पडले एकूण तीन लाख वीस हजार ७६५ मतदार आहेत यापैकी दोन लाख ४० हजार ७३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात एक लाख ६४ हजार ९३१ पुरुष तर एक लाख ५५ हजार ८२८ महिला मतदारांनी मतदान केले लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वसमत विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढली आहे वाढलेल्या मतामुळे कोणाचा फायदा होतो याचे गणित आता लावल्या जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे महायुतीला फटका बसला अशी ओरड सुरू होती होते. आता (Wasmat Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत वसमत विधान सभा मतदार संघात मतदान वाढल्याने वाढलेल्या मतामुळे महायुतीला फायदा होतो की कसे हे निकालात समजणार आहे. वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार मैदानात आहेत यात महायुतीकडून अजित पवार गटाचे आमदार राजू पाटील नवघरे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर जनसुराज्य शक्तीकडून गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज वंचित आघाडीकडून प्रीतीताई जयस्वाल या प्रमुख उमेदवारासह अकरा उमेदवार रिंगणात आहेत.
या उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले आहे वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख वीस हजार ७६५ मतदार आहेत त्यापैकी दोन लाख ४० हजार ७३७ म्हणजे ७५.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Wasmat Assembly Elections) वसमत विधानसभा मतदारसंघात ७४.४९ टक्के मतदान झाले होते दोन त्यामुळे मागच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा परिणाम काय होतो याची गणित लावल्या जात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने व सहाय्यक म्हणून तहसीलदार शारदा दळवी यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्यासह वसमत शहर पोलिसांचे कर्मचारी व राखीव दलाचे पथक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
२३ नोव्हेंबर रोजी आयटीआय येथे मतमोजणी होणार आहे निवडणुकीत निकाल काय लागतो. याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत प्रत्येक जण आपण विजयी होणार असा दावा करत आहेत त्यामुळे आता सर्वांना २३ नोव्हेंबरची प्रतीक्षा लागली आहे. (Wasmat Assembly Elections) निवडणूक विभागाच्या वतीने मत मोजणीसाठीची तयारी सुरू आहे मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन मतमोजणीच्या कामासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. मतमोजणीच्या तयारीवर निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने हे लक्ष ठेवून आहेत.