हिंगोली (Hingoli Crime) : शहरातील तिरुपती नगर भागामध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये मोटार सायकलवरून आलेल्या दोघापैकी एका व्यक्तीने जावून महिलेस चाकू लावला असतात याच वेळी महिलेच्या मुलाने अनोळखी व्यक्तीचा विरोध केला. यावेळी सदर आरोपीने मुलाला चाकू मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३५ वाजता घडली.
हिंगोलीतील तिरुपती नगर भागामध्ये सुरेंद्र सावंत यांचे निवासस्थान आहे. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३५ वाजता त्यांच्या निवास स्थानासमोर दोन अनोळखी व्यक्ती मोटारसायकल वरून आले होते. त्यातील एकाने खाली उतरुन सावंत यांच्या घराची बेल वाजविली. यावेळी सावंत यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडताच चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून सावंत यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावला. याच वेळी सावंत यांचा मुलगा श्रेयश सावंत हा घरामध्ये आला असता (Hingoli Crime) चोरट्याने आईच्या गळ्याला चाकू लावल्याचे त्याने पाहताच विरोध करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी चोरट्याने श्रेयशच्या मानेवर चाकू मारल्याने तो जखमी झाला. याच वेळी श्रेयश च्या आईने आरडाओरड करताच अनोळखी चोरट्याने मोटारसायकलवरून पलायन केले. श्रेयश सावंत हा जखमी झाल्याने त्याला तात्काळ हिंगोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Hingoli Crime) घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पोलीस पथक घटना स्थळी घावून गेले होते. पोलीसांचे पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी रात्री उशीरा
पर्यंत करीत होते.