विधानसभा मतदानानंतर लालपरी सुरळीत धावल्या
मतदान प्रक्रियेसाठी ६५ दिल्या होत्या बसेस
हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १९ व २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील तिन्ही आगारा मधील ६५ बसेस देण्यात आल्या होत्या. या दोन दिवशी प्रामुख्याने ग्रामीण भागातील बसफेर्या बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. २१ नोव्हेंबर रोजी बसस्थानकातून लालपरी पूर्ववत धावल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रिया पार पडली.
या मतदाना करीता जाणारे अधिकारी व कर्मचार्यांना जिल्ह्यातील तिन्ही आगारातून ६५ बसेस देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये (Hingoli Assembly Elections) हिंगोली आगारातून २५, कळमनुरी आगारातून २४ व वसमत आगारातून १६ बसेस दिल्या होत्या. १९ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचार्यांना रवाना करण्यात आले. त्यामुळे १९ व २० नोव्हेंबर रोजी या दोन दिवशी ६५ बसेस दिल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी बसफेर्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या दोन दिवशी अवैध वाहन चालकांची चांगलीच चांदी झाली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरी भागात असल्याने त्यांना मतदान करण्याकरीता येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे तिन्ही आगारातील ६५ बसेस पुन्हा आगाराच्या स्वाधीन करण्यात आल्या. गुरूवारपासून नेहमी प्रमाणे बसेस धावल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
दोन दिवस अवैध वाहतुकदारांची चांदी
जिल्ह्यातील तिन्ही आगारातून ६५ बसेस निवडणुकीच्या मतदानाकरीता (Hingoli Assembly Elections) देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील बसफेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. या दोन दिवशी काही ग्रामीण भागातील मतदारांना शहरी भागात येण्याकरीता अवैध वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागला.अवैध वाहतुकदारांची मात्र या दोन दिवशी चांगलीच चांदी झाली.