हिंगोली (EVM machine) : शहरा जवळील लिंबाळा मक्ता भागातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या (EVM machine) ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या निमित्ताने पोलिसांचा खडा पहारा तैनात केला आहे. स्ट्राँग रूमसह संपूर्ण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून बीएसएफ, एसआरपीएफ (मध्यप्रदेश) येथील जवानांसह जिल्हा पोलीस दलातील तीन अधिकारी, २७ कर्मचारी असा जवळपास ८० जवानांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती:
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघ निहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९२-वसमत विधानसभा मतदार संघासाठी हिमांशुकुमार गुप्ता, ९३- कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती टी. एल. संगीता आणि ९४-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.