Published on
:
21 Nov 2024, 1:12 pm
Updated on
:
21 Nov 2024, 1:12 pm
नागपूर : राज्यात महिलांचा, एकंदर मतांचा वाढलेला टक्का महायुती सरकारला पोषक ठरेल. असा दावा महायुती करत आहे. सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने संभाव्य अपक्षांना महत्व असेल असे बोलले जात असताना, आम्ही अजूनही कुणाशी संपर्क साधलेला नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदासंदर्भात अजून काहीही चर्चा नाही. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तीन पक्ष बसू आणि चांगला निर्णय घेवू असे सांगितले.
राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्याबाबत केलेल्या आरोपासंदर्भात फडणवीस यांनी 'राहुल गांधी रोज बोलतात त्यात नवीन काय?' असा उपरोधिक सवाल केला. मतदानाची टक्केवारी लाडकी बहीण सारख्या महिलांच्या योजनेमुळे वाढली आहे का? यावर बोलताना नक्कीच शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला. मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे ते म्हणाले.
महायुतीचे सरकार स्थापन होईल : देवेंद्र फडणवीस
मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यामुळे महायुतीलाच महाराष्ट्रात मतदान वाढेल. आजवरचा अनुभव आहे, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो. यामुळे मला विश्वास आहे की फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचे महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.