पर्थ कसोटीत टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता ऑस्ट्रेलियातून एक मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्याशी संबंधित ही बातमी आहे. गौतम गंभीर भारतात परत येत आहेत. गौतम गंभीर रिर्टन का येत आहेत? अचानक काय घडलं? असे अनेक प्रश्न आहेत. गौतम गंभीर भारतात का परत येत आहेत? त्या मागच्या कारणांचा खुलासा झालेला नाही. पण व्यक्तीगत कारण असल्याच समजतय. आता प्रश्न हा आहे की, गंभीर भारतात परतल्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे हेड कोच कोण असतील?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना पिंक बॉलने खेळला जाणार आहे. 6 ते 10 डिसेंबर दरम्यान एडिलेडमध्ये हा सामना होणार आहे. चांगली बाब ही आहे की, गौतम गंभीर पिंक बॉल टेस्ट मॅच सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. गौतम गंभीर यांनी भारतात परतण्याची बीसीसीआयला कल्पना दिली आहे, असं बीसीसीआयशी संबंधित सूत्राच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलं आहे. दुसऱ्या कसोटीआधी तो टीम इंडियाला जॉईंन करेल हे सुद्धा सांगितलय. भारतात परतण्यामागे व्यक्तीगत कारण असल्याच सांगितलं आहे.
दुसऱ्या टेस्टमध्ये असेल पिंक बॉल
पर्थमध्ये पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया आता कॅनबराला रवाना होणार आहे. 27 नोव्हेंबरला टीम इंडिया कॅनबराला जाईल. तिथे सरावासाठी दोन दिवसीय पिंक बॉलने मॅच खेळायची आहे. हा सामना शनिवारपासून सुरु होईल.