Published on
:
26 Nov 2024, 6:16 am
Updated on
:
26 Nov 2024, 6:16 am
महाड : महाड विधानसभा मतदार संघातून आपला भरघोस मताधिक्याने विजय होऊन आपण आमदारकीचा चौकार मारला आहे.
या निवडणुक काळात आपल्या प्रचार सभा, गाव दौरे, कॉर्नर सभा, रॅली यांना वृतपत्रातून दिलेली प्रसिद्धी ही सर्व वृत्तपत्र घरोघरी पोचवण्याचे काम या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली. त्यामुळे आपण केलेली विकास कामे, महायुतीने राबवलेल्या लोकोपयोगी कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचण्यास मदत झाली आणि मतदानाची टक्केवारी वाढून त्याचा फायदा महायुतीला झाला. याचीच जाण ठेवून महाड बिरवाडी येथे घरोघरी वृत्तपत्रांचे वाटप करणार्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आपल्या माध्यमातून सायकलींचे वाटप करून हे काम करीत असताना त्यांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले. महाड पोलादपूर माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्फत राकेश वाघ, संजय पवार, दिलीप जोशी, विठोबा दरेकर या चार वृत्तपत्र विक्रेत्यांना रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सायकलींचे वाटप करण्यात आले.