IPL 2025 Auction : या दिग्गज खेळाडूंना मेगा लिलावात फ्रेंचायझींनी नाकारलं, वाचा कोण ते

2 hours ago 1

आयपीएल मेगा लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. दोन दिवस चाललेल्या मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांची बोली लागली. पण काही दिग्गज खेळाडूंना फ्रेंचायझींनी स्पष्टपणे नाकारलं. खऱ्या अर्थाने त्यांचं आयपीएल करिअर संपुष्टात आलं असंच म्हणावं लागेल. चला जाणून घेऊयात या यादीत कोण आहेत ते

| Updated on: Nov 26, 2024 | 2:20 PM

आयपीएल मेगा लिलावात 577 खेळाडूंचं नाव अंतिम लिलावासाठी निश्चित झालं होतं. 204 जागा शिल्लक होत्या. पण फ्रेंचायझींना कमीत कमी 18 खेळाडू घेण्याची परवानगी होती. त्यामुळे 182 जणांना लिलावात भाव मिळाला. तर 395 खेळाडू हे अनसोल्ड राहिले. अनसोल्ड यादीत काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

आयपीएल मेगा लिलावात 577 खेळाडूंचं नाव अंतिम लिलावासाठी निश्चित झालं होतं. 204 जागा शिल्लक होत्या. पण फ्रेंचायझींना कमीत कमी 18 खेळाडू घेण्याची परवानगी होती. त्यामुळे 182 जणांना लिलावात भाव मिळाला. तर 395 खेळाडू हे अनसोल्ड राहिले. अनसोल्ड यादीत काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

1 / 12

 डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे. लिलावात 2 कोटी बेस प्राईससह उतरला होता. मात्र यावेळी त्याला संघात घेण्यास कोणीही रस दाखवला नाही. त्याचं नाव दोनदा यादीत आलं. मात्र तरीही पाठ फिरवली.

डेव्हिड वॉर्नर: डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे. लिलावात 2 कोटी बेस प्राईससह उतरला होता. मात्र यावेळी त्याला संघात घेण्यास कोणीही रस दाखवला नाही. त्याचं नाव दोनदा यादीत आलं. मात्र तरीही पाठ फिरवली.

2 / 12

 आयपीएल 2024 लिलावात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला आणि टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरचाही समावेश होता. त्याने त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली होती. मात्र कोणत्याही फ्रेंचायझींने त्याला विकत घेतलं नाही.

शार्दुल ठाकूर: आयपीएल 2024 लिलावात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला आणि टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरचाही समावेश होता. त्याने त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली होती. मात्र कोणत्याही फ्रेंचायझींने त्याला विकत घेतलं नाही.

3 / 12

 गेल्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद संघात दिसलेला मयंक अग्रवाल यावेळी एक कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता. पण त्यालाही संघात कोणीही पुढाकार घेतला नाही. ऑक्शनवर वारंवार फ्रेंचायझींकडे पाहात होती. शेवटी तिने अनसोल्ड असं घोषित केलं.

मयंक अग्रवाल : गेल्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद संघात दिसलेला मयंक अग्रवाल यावेळी एक कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता. पण त्यालाही संघात कोणीही पुढाकार घेतला नाही. ऑक्शनवर वारंवार फ्रेंचायझींकडे पाहात होती. शेवटी तिने अनसोल्ड असं घोषित केलं.

4 / 12

 गुजरात टायटन्स संघाचा भाग असलेला केन विल्यमसनला भाव मिळाला नाही. वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नाही. तो 1.50 कोटींसह लिलावात उतरला होता. मात्र तरीही त्याला कोणीही घेतलं नाही.

केन विल्यमसन: गुजरात टायटन्स संघाचा भाग असलेला केन विल्यमसनला भाव मिळाला नाही. वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नाही. तो 1.50 कोटींसह लिलावात उतरला होता. मात्र तरीही त्याला कोणीही घेतलं नाही.

5 / 12

 आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला, मात्र संपूर्ण पर्वात फेल गेला. एक शतक त्याच्या फलंदाजीतून आलं होतं. पण त्याचा फॉर्म नसल्याचं फ्रेंचायझींनी पाहिलं आहे. जॉनी बेअरस्टो 2 कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता.

जॉनी बेअरस्टो: आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला, मात्र संपूर्ण पर्वात फेल गेला. एक शतक त्याच्या फलंदाजीतून आलं होतं. पण त्याचा फॉर्म नसल्याचं फ्रेंचायझींनी पाहिलं आहे. जॉनी बेअरस्टो 2 कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता.

6 / 12

 आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान दिसला होता. सुरुवातीच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र स्पर्धा मधेच सोडून गेला होता. त्यामुळे त्याचं वागणं फ्रेंचायझींना खटकलं असावं. रहमान 2 कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता. त्याला संघात घेण्यात कोणीही रस दाखला नाही.

मुस्तफिजुर रहमान: आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान दिसला होता. सुरुवातीच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र स्पर्धा मधेच सोडून गेला होता. त्यामुळे त्याचं वागणं फ्रेंचायझींना खटकलं असावं. रहमान 2 कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता. त्याला संघात घेण्यात कोणीही रस दाखला नाही.

7 / 12

 गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रायकर रिले रोसोव्हला कोणीही संघात घेतलं नाही. लिलावात त्याने 2 कोटी रुपये बेस प्राईस ठेवली होती. पण त्याच्याकडे दहाही फ्रेंचायझींनी पाठ फिरवली.

रिले रोसोव : गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रायकर रिले रोसोव्हला कोणीही संघात घेतलं नाही. लिलावात त्याने 2 कोटी रुपये बेस प्राईस ठेवली होती. पण त्याच्याकडे दहाही फ्रेंचायझींनी पाठ फिरवली.

8 / 12

 ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथला गेल्या पर्वातही डावललं गेलं होतं. असं असूनही स्टीव्ह स्मिथ मेगा लिलावात उतरला होता. त्याने त्याची बेस प्राईस 2 कोटी ठेवली होती. मात्र त्यालाही फ्रेंचायझींनी नकार दर्शवला.

स्टीव्ह स्मिथ : ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथला गेल्या पर्वातही डावललं गेलं होतं. असं असूनही स्टीव्ह स्मिथ मेगा लिलावात उतरला होता. त्याने त्याची बेस प्राईस 2 कोटी ठेवली होती. मात्र त्यालाही फ्रेंचायझींनी नकार दर्शवला.

9 / 12

 आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळलेला वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफकडेही फ्रेंचायझींनी पाठ फिरवली. गेल्या वेळी पर्वात त्याला 11.5 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. पण मेगा लिलावात 2 कोटी बेस प्राईस ठेवूनही अल्झारीला भाव मिळाला नाही.

अल्झारी जोसेफ: आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळलेला वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफकडेही फ्रेंचायझींनी पाठ फिरवली. गेल्या वेळी पर्वात त्याला 11.5 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. पण मेगा लिलावात 2 कोटी बेस प्राईस ठेवूनही अल्झारीला भाव मिळाला नाही.

10 / 12

 गेल्या मोसमात पंजाब किंग्ज संघात दिसलेला झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाला यावेळी भाव मिळाला नाही. मेगा लिलावात 1.25 कोटी बेस प्राईससह उतरला होता. मात्र तरीही फ्रेंचायझींनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

सिकंदर रझा: गेल्या मोसमात पंजाब किंग्ज संघात दिसलेला झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाला यावेळी भाव मिळाला नाही. मेगा लिलावात 1.25 कोटी बेस प्राईससह उतरला होता. मात्र तरीही फ्रेंचायझींनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

11 / 12

 प्रथमच आयपीएल लिलावात दिसलेला इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनलाही भाव मिळाला नाही. 1.25 कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता. मात्र फ्रेंचायझींनी त्याच्याकडेही पाठ फिरवली.

जेम्स अँडरसन : प्रथमच आयपीएल लिलावात दिसलेला इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनलाही भाव मिळाला नाही. 1.25 कोटी बेस प्राईससह लिलावात उतरला होता. मात्र फ्रेंचायझींनी त्याच्याकडेही पाठ फिरवली.

12 / 12

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article