निकालाबाबत जितेंद्र आव्हाडांचा अमित शहांचे नाव घेत मोठा दावा:म्हणाले - ते प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत निघून गेले अन् निकाल फिरले

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. हा जनतेचा कौल असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत, तर ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच या निकालाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहांचे नाव घेऊन मोठा दावा केला आहे. अमित शहा प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत अचानक महाराष्ट्रातून निघून गेले आणि त्यानंतर निकाल फिरले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे अपयश आले. सोमवारी संध्याकाळी शरद पवारांच्या पक्षाची बैठक झाली. या बैठकीत या निकालाबाबत आत्मचिंतन करण्यात आले. या बैठकीनंतर नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. अमित शहा दोन दिवस जातात कुठे? हरियाणाच्या प्रचाराच्या ऐन शेवटच्या दोन दिवस शाह हरियाणातून निघून गेले. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत ते निघून गेले. हे दोन दिवस जातात कुठे? हा एक चौकशीचा मुद्दा असल्याचे आव्हाड म्हणाले. प्रचाराच्या दोन दिवस आधी निघून गेल्यानंतर निवडणुका होतात आणि त्यांचे निकाल फिरतात. त्यावेळीही त्यांनी जम्मू-काश्मीर देऊन हरियाणा घेतले. आता इथेही झारखंड दिले आणि महाराष्ट्र घेतले. हे संशयास्पद असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजित पवारांकडून आमच्या लोकांना फोन अजित पवार गट आणि स्वत: अजित पवारांकडून आमच्या आमदारांना फोन केला जात असल्याचा दावा आव्हाड यांनी केला. त्यांच्याकडून आमच्या वेगवेगळ्या आमदारांना फोन जात आहेत. पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत. आता काय राहिले आहे. आमच्याकडे या. असे म्हणत आहेत. पण शरद पवारांना सोडून जाण्याची आमची कुणाचीही मानसिकता नाही. ही अजित पवारांची जुनी सवय आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. त्यांनी कुणाकुणाला फोन केले, हे मी नाव घेऊनही सांगू शकतो. मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे आव्हाड म्हणाले. आता वेळ आली तर शिंदेंना काढून फेकून दिले मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असल्याचे पाहून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण झाले. ते नाराज होणार. त्यांनी मोठी जोखीम पत्करून शिवसेना पक्ष फोडला. एवढे करूनही आज त्यांना काढून फेकून दिले. हे योग्य नाही. ज्या व्यक्तीने हे सरकार बनवण्यात एवढी मोठी भूमिका निभावली, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा वापर केला. आता वेळ आली तर त्याला काढून फेकून दिले. त्यांना वाईट तर वाटणारच. पिपाणीमुळे आमच्या पक्षाचे नुकसान जितेंद्र आव्हाड यांनी पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा केला. पिपाणी चिन्हामुळे आमचे नुकसान झाले. पिपाणीमुळे आमच्या 10 जागा पडल्या. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात देवदत्त निकम यांच्याप्रमाणेच सारखंच नाव असणाऱ्या व्यक्तीला 4 हजार मते पडली. वळसे पाटील 1200 ते 1500 मतांनी निवडून आले. त्यामुळे त्याचा फटका बसलाच, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article