दिव्य मराठी विशेष:चीन युद्ध, कन्नमवारांचे निधन आदी कारणांमुळे नागपुरात झाली नाही ५ अधिवेशने; सरकारला वेळ हवा म्हणून झाली अल्पकालीन अधिवेशने
2 hours ago
1
१९६२, १९६३, १९७९, १९८५ व २०२० अशी पाच हिवाळी अधिवेशने नागपुरात होवू शकली नाही. तर २०२१ ची तीनही अधिवेशने १ मार्च ते १० मार्च २०२१, ५ ते ६ जुलै २०२१ आणि २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ या अल्प कालावधीसाठी मुंबईत घेण्यात आली. नागपुरात अल्पकालावधीची काही अधिवेशने झाली. यामध्ये १९८४ साली तिसरे अधिवेशन १२ ते १७ नोव्हेंबर असे केवळ सहा दिवसांचे झाले. यात ६ बैठका झाल्या. तर १९८९ मध्ये केवळ १६ ते २० आॅक्टोबर असे ५ दिवसांचे झाले. बहुतांश अधिवेशने दोन आठवड्यांची होतात. त्यात सुट्या धरून प्रत्यक्ष कामकाज ९ दिवसांचे होते. १९६० पासून नोव्हेंबरमध्ये २१ अधिवेशने झाली. १९६२ मधये भारत चीन युद्ध, १९६३ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार, १९७९ मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणूका जाहीर झाल्यामुळे, १९८५ मध्ये काँग्रेसच्या शताब्दी वर्षाचा पूर्वनियोजित कार्यक्रम मुंबई येथे असल्यामुळे तर २०२० मध्ये वैश्विक महामारी कोरोनामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशने होवू शकली नाही. २०२० मध्ये ८ जानेवारी, २४ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२०, ७ ते ८ सप्टेंबर २०२० आणि १४ ते १५ डिसेंबर २०२० या अल्पकालावधीसाठी मुंबईत घेण्यात आली. काही अधिवेशने वेगवेगळ्या महिन्यात झाली. यामध्ये १९६१ मध्ये १४ जुलै ते ३० आॅगस्ट, १९६६ मध्ये २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर, १९७७ मध्ये १७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर, १९६१ मध्ये १४ जुलै ते ३० आॅगस्ट, १९६६ मध्ये २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर, १९७१ मध्ये ६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोंबर, १९७७ मध्ये १७ आॅक्टोबर ते ४ नाेव्हेंबर, १९८६ मध्ये ६ ते २४ जानेवारी, १९८० मध्ये २१ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत अधिवेशने झाली होती. १ नोव्हेंबर १९५६ ते ३० एप्रिल १९६० या कालावधीतील १० अधिवेशने खास करून मुंबईत झाली. तर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या नंतर १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे अधिवेशन झाले. त्यात २७ बैठका झाल्या. १९६१ मध्ये १४ जुलै ते ३० आॅगस्ट कालावधीत झालेल्या अधिवेशनात २५ बैठका झाल्या. त्या नंतर एकदम १९६४ मध्ये १८ नाेव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत झालेल्या अधिवेशनाच्या २३ बैठका झाल्या. अशा प्रकारे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज हळुहळु कमी होत गेले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)