Published on
:
26 Nov 2024, 10:46 am
Updated on
:
26 Nov 2024, 10:46 am
जळगाव | मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज जळगाव जिल्हा पोलीसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहिदांना पोलीस मुख्यालय जळगाव येथे आज श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमास जळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग संदीप गावित व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.