दर्यापुरात यंदाही ‘नोटा’ने पार केला हजाराचा आकडा:३५ मते ही शासकीय कर्मचारी व सैनिकांची; वाचा ‘नोटा’च्या अगोदर काय होते?
2 hours ago
1
अनुसुचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या दर्यापूर विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले. या निवडणुकीत एकाही उमेदवाराला पसंत न करणारे १ हजार ३ मतदार आहेत. अर्थात या सर्वांनी ‘नन ऑफ द अबव्ह’ नोटा हा पर्याय स्वीकारुन इव्हीएमवर आपले मत नोंदवले. सन २०१९ च्या गेल्या निवडणुकीत १ हजार ३७६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला होता. येथे एकूण ३ लाख ८ हजार ४४५ मतदार आहेत. यापैकी २ लाख ८ हजार ५५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी एक हजार तीन मतदारांनी नोटा या पर्यायी बटनाचा वापर केला. प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या सर्व १६ उमेदवारांपैकी कोणालाही त्यांनी पसंती दर्शवीली नाही. या निवडणुकीत विविध पक्षाचे ९ आणि अपक्ष ६ असे एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. यापैकी कुणीही आमदार निवडण्याच्या योग्यतेचा नाही, असे म्हणत एकूण १ हजार ३ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले. यातील ३५ मते ही शासकीय कर्मचारी व सैनिकांची आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे गजानन लवटे यांनी जिंकली. १९ हजारापेक्षा अधिक मतांच्या फरकाने त्यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांचा पराभव केला आहे. ‘नोटा’ आधी काय होते? नोटा पर्याय येण्यापूर्वी कलम ४९ (०) होते. कन्डक्ट ऑफ इलेक्शन रुल्स १९६१ नुसार मतदार १७ ‘अ’ नंबरचा फॉर्म भरुन द्यायचे. या अर्जामध्ये संबंधित व्यक्ती मतदार यादीतील क्रमांकासोबतच कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असे लिहीत असत. निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर लिहीत आणि मतदारांची स्वाक्षरी त्याठिकाणी घेत असे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान २७ सप्टेंबर २०१३ या दिवशी पहिल्यांदा नोटाचा वापर झाला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)