गुरुवारी गुरुकुंजात बाल साहित्य संमेलन:अध्यक्षस्थानी कोल्हापुरचे बाल साहित्यिक डॉक्टर श्रीकांत पाटील

2 hours ago 1
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे आगामी गुरुवार, २८ नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथीच्या पर्वावर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीच्या स्मृती मंदिरात बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापुरचे ज्येष्ठ कादंबरीकार व बाल साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध इतिहास संशोधक, ख्यातनाम वक्ते, लेखक व मराठा सेवा संघाचे राज्य महासचिव चंद्रशेखर शिखरे, पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी चाळक, प्रसिद्ध साहित्यिक तथा साहित्य संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य विलास सिंदगीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रियाताई देशमुख व विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य दिलीप काळे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड (मुंबई) यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार असून त्यापूर्वी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. सकाळी ११ वाजता 'बालसाहित्य वास्तव आणि अपेक्षा' या विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ राहणार असून या परिसंवादात प्राचार्य एकनाथ तट्टे परतवाडा, प्राचार्य राजावलीकर अमरावती, प्रा. डॉ. प्रशांत राऊत नागपूर, प्रा. प्रणाली तेली कोल्हापूर, प्रा. अलका गायकवाड अमरावती व ॲड. नीता कचवे दर्यापूर हे सहभागी होणार आहेत. दुपारी दीड वाजता सुप्रसिद्ध बाल साहित्यिक बबन शिंदे नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन आयोजित करण्यात आले असून यात विलास सिंदगीकर, प्रा. विजया मारोतकर, डॉ. शोभा गायकवाड, प्राचार्य अनिल प्रांजळे, डॉ मंदा नांदुरकर, चंद्रकांत निकाळे, विनोद तिरमारे, बबलू कराळे आपल्या कथा सांगणार आहेत

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article