Published on
:
04 Dec 2024, 7:59 am
Updated on
:
04 Dec 2024, 7:59 am
सासष्टी : दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर शॅक्स मालकांनी मोठी शॅक्स उभारली असून पर्यटनासाठी सज्ज झाले आहेत. पण विदेशी पर्यटकांचा अभाव आढळून येतो. किरकोळ पर्यटकांमुळे किनाऱ्यावर शॅक्सचा व्यवसाय बहरणे कठीण आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स मालक विदेशी पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात २७ सप्टेंबरपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. सध्या पर्यटन हंगाम सुरू होऊन सुमारे दोन- अडीच महिने उलटले तरी वर्षपद्धतीप्रमाणे विदेशी पर्यटक किनाऱ्यावर दाखल झालेले दिसत नाहीत. विदेशी पर्यटकच रॉक्स मालकांच्या व्यवसायाचे प्रमुख घटक आहेत.
दक्षिण गोव्यात बोगमोळो पासून कासावली, वेळसाव पाळे, माजोर्डा, उतोर्डा, बेताळभाटी, कोलवा, बाणावली, वार्का, केळशी, मोबर तसेच पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर भेट दिली असता वर्षपद्धतीप्रमाणे येथे दाखल होणारे विदेशी पर्यटक दिसून आले नाहीत. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके किरकोळ विदेशी पर्यटक किनाऱ्यावरील शंक्स मध्ये दिसले. गोव्यात विदेशातील चार्टर विमाने येण्यास गेल्या दोन महिन्यांपासून सुरुवात झाली आहे.
त्याशिवाय जहाजमार्गे बरेच विदेशी पर्यटक येथे दाखल होतात. खरे म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत येथे जादा प्रमाणात विदेशी पर्यटक येतात. याच दोन महिन्यात व नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर शंक्स मालक विदेशी पर्यटकांवर अवलंबून असून संपूर्ण पर्यटन हंगामाची अर्थी कमाई करत असत. पण यावर्षी किनाऱ्यावर विदेशी पर्यटकांचा अभाव असल्याने शंक मालक चिंतीत बनले आहेत.
बाणावली येथील एक शंक मालक डॉमनिक फर्नांडिस म्हणाले की, किनाऱ्यावर विदेशी पर्यटकच रॉक्स व्यावसायिकांचा श्वास असतो. ते रात्रंदिवस किनाऱ्यावरच असतात. खरोखरच व्यावसायिक दृष्टिकोनातून विदेशी पर्यटक शॅक्स मालकांना लाभदायक ठरतात. सध्या आपले देशी पर्यटकच किनाऱ्यावर जास्त प्रमाणात आढळून येतात. देशी पर्यटकांचे खाणे पिणे मर्यादित असते. ते मद्यपानही कमी प्रमाणात करतात. त्यामुळे हंगामात शॅक्स मालकांची अपेक्षित कमाई होत नसून यंदा व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
रॉक्स व्यवसाय न परवडणारा
सरकारने गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावरील शंक्स व्यावसायिकांना अमाप शुल्कवाढ केली आहे. त्याशिवाय अबकारी खात्याने मद्यपी करात भरमसाट वाढ केलेली आहे. मद्यही जास्त प्रमाणात वाढलेले आहे. बदलत्या काळात कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ झालेले आहे. तरी शंक मध्ये काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत. परराज्यातील कामगारांना घेऊन शंक्सचा व्यवसाय चालवावा लागतो. देशी पर्यटकांवर अवलंबून शंक्स मालकांना व्यवसाय परवडणारा नाही. ही सगळ्याच शंक मालकांची खंत आहे, असे डॉमनिक फर्नाडिस यांनी सांगितले.
पर्यटन हंगामाला उलटले अडीच महिने
व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता