Budget 2025 पूर्वीच सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान आले आहे. सोमवार-मंगळवारी किंमतीत घसरण झाल्यानंतर बुधवार आणि गुरुवारी दोन्ही धातुच्या किंमती भरघोस वाढल्या. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. बजेटपूर्वीच मौल्यवान धातुने चमक दाखवली. उद्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. बजेटमध्ये दोन्ही मौल्यवान धातुवरील करात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती, आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 31 January 2025 )
सोन्याची तुफान घोडदौड
सोन्याच्या किंमती या महिन्यात सातत्याने वाढत आहे. मध्यंतरी त्यात थोडी घसरण झाली. मागील 15 दिवसात दर 3000 रुपयांनी वधारले. तर या सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 170 आणि 320 रुपयांची घसरण झाली. 29 जानेवारी रोजी सोन्याने 920 रुपयांचा धमाका केला. गुरुवारी सोने 170 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 76,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 83,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हे सुद्धा वाचा
ब्रेकनंतर चांदी सुसाट
जानेवारीमधील 15 दिवसात चांदी 4 हजारांनी महागली तर 2 हजारांनी स्वस्त झाली. 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही. 24 जानेवारीला 1 हजारांची दरवाढ तर 27 जानेवारीला 1 हजारांची घसरण झाली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 81,303, 23 कॅरेट 80,977, 22 कॅरेट सोने 74,474 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,977 रुपये, 14 कॅरेट सोने 47,562 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,184 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.