संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व स्वातंत्र्य सेनानी अण्णाराव टाकळगव्हाणकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन
हिंगोली () : संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व स्वातंत्र्य सेनानी अण्णाराव टाकळगव्हाणकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या त्याग समर्पक कार्यातून समाज व देश यासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या सात महतींचा व्यक्तिमत्त्वाचा कृतज्ञता पर (Gratitude Gaurav Samman) सन्मान सोहळा ८ फेब्रुवारी रोज शनिवारी येथील शांती हॉटेल येथे आयोजित केला आहे.
स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब टाकळगव्हाणकर प्रतिष्ठान, श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर (चित्ता) व जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी व शिक्षण संस्था हिंगोली यांच्या संयुक्त पुढाकाराने अमृताहुनी गोड व्यक्तिमत्त्वांचा कृतज्ञता पर सन्मान सोहळा व विचारांचा मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक योद्धा थोर सत्यशोधकी व प्रगतशील शेतकरी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर , महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती बाबुराव उर्फ अंकुशराव कदम माजी प्राचार्य डॉ. ब. न. जाजू, माजी प्राचार्य डॉ. जयनारायण मंत्री, प्राध्यापक विलास वैद्य, पत्रकार तुकाराम झाडे यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान (Gratitude Gaurav Samman) करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृततर व भारतीय संविधानाच्या अमृत अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने या व्यक्तिमत्वांनी आपल्या अंगी असलेला त्याग धैर्य सचोटी व अभिजात कलागुणांनी समाजाला प्रेरक दिशा देऊन शैक्षणिक तंत्रशिक्षण वैद्यकीय पर्यावरण व कृषी सामाजिक तसेच साहित्य व कलाक्षेत्रात अमृततुल्य असं कार्य केले आहे म्हणून अशा अमृताहुनी गोड महंतींचा संत नामदेवाच्या जन्माने पावन झालेल्या जन्मभूमीत स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब टाकळगव्हाणकर यांच्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव व सन्मान सोहळा व विचारांचा मेळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, प्रमुख उपस्थिती आमदार तानाजी मुटकुळे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल व प्रमुख वक्ते म्हणून यशदा चे मानद व्याख्याते तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी देविदास बोरसे उपस्थित राहणार आहेत. स्वर गंधर्व बाळासाहेब सुरेगावकर महाराज यांच्या गीतांजलीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या (Gratitude Gaurav Samman) कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ज्येष्ठविधीज्ञ तथा माजी जिल्हा सत्र न्यायाधीश पी.के. पुरी हे आहेत.स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या 18 वर्षापासून व्याख्यान शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.
गतवर्षी ईशान्य भारताचे अभ्यासक व दलित किचन ऑफ मराठवाडा या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांचे “मणिपुर समजून घेताना” या विषयावर व्याख्या दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध विचारवंत तथा लेखक राजन खान यांचं स्त्रियांच्या प्रश्नावर “बाईचं जगन” या विषयावर. याशिवाय कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर यांच्या (Gratitude Gaurav Samman) स्मृतिदिनानिमित्त गेल्या अठरा वर्षांमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक, लेखक विचारवंत यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये आपल्या शाहिरीतून देशभक्तीची चेतना पेटवणारे ज्यांनी जंगल सत्याग्रहासाठी लोकांमध्ये जनजागृती केली दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी प्रभाकर वाईकर उर्फ संपत पाटील, सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ, प्राध्यापक दत्ता भगत, एमजीएम खगोलशास्त्र विभागाचे डॉक्टर श्रीनिवास औंदकर, आदींनी हजेरी लावली होती.
कृतज्ञता गौरव सन्मान सोहळा (Gratitude Gaurav Samman) व विचारांचा मेळा या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक समितीचे खंडेराव सरनाईक वामन टाकळगव्हाणकर , उत्तमराव जगताप ,विठ्ठल सोळंके, संजय टाकळगव्हाणकर, विश्वनाथ कोरडे, रामकिसन बोरकर, श्रीराम टाकळगव्हाणकर, सुधाकर माळकर, गंगाप्रसाद भिसे ,संजय नाईक, सुनील खिल्लारी पाटील, सौरभ चव्हाण, संजय पवार आदींनी केले आहे.