Hingoli: अप्पर तहसील कार्यालयासमोर १०१ नारळ फोडून आंदोलन

2 hours ago 2

हिंगोली (Hingoli) :- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालय नावालाच असून या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २३ सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी कार्यालयासमोर १०१ नारळ फोडून अनोखे आंदोलन केले. यापुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची ग्रामस्थांची मागणी

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाची घोषणा सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. त्यामुळे या भागातील गावकऱ्यांना सेनगावला जाण्याचा त्रास कमी होऊन गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयातच कागदपत्रे मिळतील अशी अपेक्षा होती. अप्पर तहसील कार्यालयाची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्याची घोषणा केली. तसेच कार्यालय देखील उभारण्यात आले. मात्र या ठिकाणी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतच नाही. या सोबतच या ठिकाणी तलाठी कार्यालय असून दोन तलाठ्यांच्या नियुक्त्या आहेत. मात्र दोन्ही तलाठी गैरहजर राहात असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. सध्या नागरीकांना विविध कागदपत्रे (Documents) मिळविणे यासाठी सेनगाव येथेच जावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून सेनगाव तहसील कार्यालयातूनच कागदपत्रे दिली जात असेल तर गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाची घोषणाच केली कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात आला.

या ठिकाणी अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे यासाठी नागरीकांनी १०१ नारळ फोडून आंदोलन केले. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, अशोक कावरखे, सखाराम भाकरे, राजकुमार कावरखे, चंद्रकांत सावके, दिलीप कावरखे, राहूल कावरखे, आत्माराम वानखेडे उपस्थित होते.

कागद काढून दाखवा अन् १ लाख रुपये मिळवा- गजानन कावरखे

गोरेगाव अप्पर तहसील कार्यालय नावालाच असून या ठिकाणी कुठलेही कागदपत्रे मिळत नाहीत. सन २०१९ पासून हिच परिस्थिती असून अप्पर तहसील कार्यालय असून वळंबा अन नसून खोळंबा अशी स्थिती आहे. या कार्यालयाकडून कोणताही कागद काढून दाखविल्यास १ लाख रुपये पारितोषीक दिले जाईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article