कळमनुरी विधानसभा मतदारसंघ
कळमनुरी (Kalmanuri Assembly Elections) : विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत ७३.६३ टक्के मतदान झाले असून गेल्या लोकसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभेमध्ये ६३.६० टक्के मतदान झाले होते. या (Kalmanuri Assembly Elections) निवडणुकीत दहा टक्क्यांच्या वर मतदान वाढले असल्याने हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे.
कळमनुरी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी विधानसभेची निवडणूक एकतर्फी होईल असे बर्याच जणांनी भाकीत मांडले होते; परंतु महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील (Kalmanuri Assembly Elections) राजकारणात हळूहळू रंग आली त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाकडून विद्यमान आमदार संतोष बांगर तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर झाली तर वंचित बहुजन आघाडी कडून डॉ.दिलीप मस्के त्यांना उमेदवारी जाहीर झाली यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक असलेले अजित मगर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शेतकरी नेते म्हणून आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता.
या विधानसभा निवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात होते कळमनुरी विधानसभेत चौरंगी लढत होईल असा अंदाज असताना मतदार संघात आणि घडामोडी झाल्याने शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक महायुतीचे उमेदवार संतोष बांगर व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.संतोष टारफे यांच्यात लढत झाली सर्व महाराष्ट्राची लक्ष असलेल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात २० नोव्हेंबर रोजी अत्यंत शांततेत मतदान पार पाडले. (Kalmanuri Assembly Elections) विधानसभेत ७३.६३ टक्के मतदान झाले असून ३ लाख ३० हजार ६८६ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ४९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला यामध्ये १ लाख २८हजार ७६८ इतक्या पुरुषांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला तर १ लाख १४ हजार ७१८ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास ६३ टक्के मतदान झाले होते; परंतु यावेळेस मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने ७३ टक्के मतदान झाले असून ४० हजाराच्या वर मतदान वाढलेले असल्याने वाढलेल्या मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.