कॉमेडीयन कृष्णा अभिषेक याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाहचा मोठा अपघात घडला आहे. तिने सोशल मीडियावर अपघाताचे फोटो शेअर केले आहे. यामध्ये रक्ताने भरलेले कपडे दिसत आहेत. शिवाय तिने फोटोसोबत हा अपघात किती भयंकर होता याचा अंदाज लावला जाऊ शकतो असे लिहीले आहे.
कश्मीराने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, त्या फोटोमध्ये तिने गाडीतील सीटवर रक्ताने माखलेला कपडा दिसत आहे. शिवाय या फोटोसह तिने पोस्ट लिहीली आहे. कश्नीराने इंस्टाग्राम लिहीले आहे की, थॅक यू देवा मला वाचविण्यासाठी. खूप भयंकर अपघात होता. काहीतरी भयंकर होणार होते पण थोडक्यावर निभावले. आशा आहे की कोणतेही डाग नसतील. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एकावेळी जगा. परत येण्याची वाट पाहू शकत नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.
कश्मिराच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी सतत कमेंट करत आहेत. कृष्णा अभिषेकनेही कमेंट करत लिहिले- देवाचे आभार मानतो की तू सुरक्षित आहेस. अभिनेत्री किश्वर मर्चंटला विचारले तू ठीक आहेस ना? दीपशिखा नागपालने लिहिले- लवकर परत ये. तनाज इराणीने लिहिले- ओएमजी हे खूप भयंकर आहे. चाहतेही कश्मीराची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर येत आहेत.