एटीएमची कार्डचीअदलाबदल करुन फसवणूक करणाऱ्याला पोचोड पोलिसांनी अटक केली.Pudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 11:54 am
Updated on
:
18 Nov 2024, 11:54 am
पैठण : पैठण तालुक्यातील कडेठाण येथील एक शेतकरी पाचोड येथील आठवडे बाजारात बैल खरेदी करण्यासाठी गेले असता. यावेळी एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून पैसे काढत असताना एका अनोळखी भामट्याने पैसे काढण्यासाठी मदत करतो असा बहाना करून एटीएम कार्डची हेराफेरी करून पैठण येथे १ लाख ९९ हजार ९७१ रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली असून. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी हरियाणातील एका भामट्याला अटक केले.
अटक केलेल्या भामट्याचे नाव मनोज कुमार सुभेसिंग ( ३०२ बार्शी १३४ भिवानी हरीयाणा) अशा असून या भामट्याने इतर काही ठिकाणी अशाच पद्धतीने फसवणूक केली का काय यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी तपास सुरू केला आहे.
अधिक माहिती अशी की कडेठाण येथील शेतकरी संदीप सुभाष काळुसे हा शेतकरी बैल घेण्यासाठी पाचोड येथे आठवडे बाजार गेले असता. यावेळी बैल खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने पाचोड बाजार तळाच्या परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढत होते. या ठिकाणी पैसे काढण्यात अडचणी येत असल्याने एटीएम मध्ये उपस्थित असलेल्या एका हिंदी भाषा बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने या शेतकऱ्याला पैसे काढून देतो असा बहाना करून शेतकऱ्याचे एटीएम कार्डची हेराफेरी केली.
करून काही तासातच पैठण येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीन मधून सलग तीन वेळेस पैसे काढल्याचा एसएमएस या शेतकऱ्याला आला. शंका आल्याने त्यांनी एटीएम कार्ड तपासून पाहिले असता जवळ असलेल्या एटीएम कार्डचा नंबर वेगळा आढळून असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांने पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाचोड सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांच्या मदतीने तत्काळ मनोज कुमार सुभेसिंग रा. बार्शी १३३ भिवानी हरीयाणा या भामट्याला पैठण येथील एचडीएफसी बँकेच्या परिसरातून अटक करून गुन्हा दाखल केला. या आरोपीने इतर काही गावात अशाच पद्धतीने फसवणूक केली काय यासंदर्भात पाचोड पोलीस तपास करीत आहेत.