khamkhura Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू

2 hours ago 1

इसापूर खामखुरा परिसरातील घटना

अर्जुनी मोरगाव (khamkhura Accident) : प्रकृती खाल्यावल्याने इटखेडा येथे उपचारासाठी गेलेल्या मायलेकीच्या मोपेडला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वडसा -कोहमारा राज्य महामार्गावर खामखुरा गावानजीक काल (ता.७) रात्री ८:१५ वाजताचे सुमारासची आहे. दिपाली अनिल डोंगरवार (३३) रा.खामखुरा व निर्मला योगराज कापगते (६०) रा. मुरमाडी ता. लाखांदूर अशी मृतकाची नावे आहेत. या (khamkhura Accident) घटनेने खामखुरा गावात शोककळा पसरली आहे.

सविस्तर असे की, मुरमाडी येथील निर्मला कापगते यांची प्रकृती खालावल्याने मुलगी दिपाली डोंगरवार हिने दुचाकी क्र.एमएच-३५/एव्ही-५२५७ ने इटखेडा येथील खासगी डॉक्टराकडे जाण्यासाठी खामखुर्रावरून निघाल्या. उपचारानंतर गावी परत येत असताना वडसा- कोहमारा राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला (मोपेड) धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही मायलेकी घटनस्थळीच मृत्यू झाला. (khamkhura Accident) घटनेनंतर सदर वाहनाने पळ काढला.

फिर्यादी अनिलकुमार तेजराम डोंगरवार (४१) रा.खामखुरा याचे तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी (khamkhura Accident) अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ भारतीय न्यायसंहिता, सह कलम १८४, १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोनि कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रोहनकर करीत आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article