Kolhapur Accident | आंबेवाडीजवळ कार-मोटर सायकलचा अपघात; दोघे गंभीर जखमी

2 hours ago 1

आंबेवाडीजवळ कार-मोटर सायकलचा अपघातfile photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

07 Oct 2024, 4:18 am

Updated on

07 Oct 2024, 4:18 am

प्रयाग चिखली : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी जवळील रेडेडोह येथे कारने दोन मोटरसायकलला उडवल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. शरद मधुकर यादव- राहणार नवीन चिखली (वय 28) तर तृप्ती अशोक सासणे राहणार कबनूर-इचलकरंजी (वय 26) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर सकाळी बारा वाजता जोतिबाकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या गाडीने रेडे डोह परिसरात समोरून येणारे शरद यादव यांच्या मोटरसायकलला तसेच मोटर सायकलच्या पाठीमागून डबल सीट येणाऱ्या दोन महिलांच्या ज्युपिटर गाडीला उडवले. या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार शरद मधुकर यादव याच्या पायाला दुखापत झाली. तर जुपिटरवरील महिला तृप्ती सासणे यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनास्थळी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस हे.कॉ. संजय काशीद यांनी पंचनामा केला. अपघातातील कारसह तिन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील कार पोलिसांनी ताब्यात घेतली मात्र रात्री उशिरापर्यंत कार चालकास ताब्यात घेतलेले नव्हते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article