Latur: मराठा समाजाचे मुंडन आंदोलन तर पाच जण चढले मोबाईल टाॕवरवर

2 hours ago 2

निलंगा(Latur):- मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठींबा देत लातूर जिल्ह्य़ातील निलंगा शहरात छञपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवानी प्रशासनाचा निषेध करत मुंडन आंदोलन केले तर पाचजण टाॕवरवर चढले होते.समाजबांधवानी विनंती केल्यानंतर टाॕवरवरून खाली उतरताच पोलिसांनी पाचही आंदोलनाकाना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी पाचही आंदोलनाकाना घेतले ताब्यात

दिनांक २२ रोजी मराठा योध्दा मनोज जरांगे (Manoj Jarange)पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठींबा देत सकाळी ११ वाजता शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या अनेकानी आपले मुंडन करून सरकारचा निषेध केला तर शहरातील किरण पाटील,सतिश फट्टे,राहूल बिरादार, रीतेश तांबोळी, मंगेश गाडीवान यानी सकाळपासूनच मोबाईल टाॕवरवर चढले होते. अंतवली सराटी येथील मनोज जरांगे समर्थक व्यक्तीचा फोन आल्यानंतर सर्वचजन खाली उतरले परंतु या पाचहीजनाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article