Parbhnani: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन, गंगाखेड, जिंतूर बंद..!

1 hour ago 2

परभणी (Parbhani):- मराठा योध्दा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने उपोषणाच्या समर्थनार्थ रविवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणीसह सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चालढकल केली जात आहे

मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चालढकल केली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. याकडे शासनाने पुर्णतः दुर्लक्ष होत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील समाज बांधवांनी रविवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. त्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लढगें जितेंगे, हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढे,हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळून शांतता राखत बंद पाळण्यात आला आहे. मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी कुडलाही अनुचित प्रकार घडला नसुन शांतेत बंद यशस्वी झाला आहे.

सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद

परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या हाकेला परभणीसह सोनपेठ, सेलू, पूर्णा, पाथरी, पालम, चारठाणा, मानवत तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. समाजाच्यावतीने प्रशाासनाला निवेदन देण्यात आले. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या सोमवारी जिंतूर, गंगाखेड तालुक्यात बंद पाळण्यात येणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article