बुलढाणा(Buldana):- नांदेड( Nanded)) येथे अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘श्री.चक्रधर स्वामी उत्कृष्ट मराठी वाड्मय पुरस्कार ’ त्यांच्या “मनस्विनी” या कादंबरीला १५ सप्टेंबरला मिळाला. सुप्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांचे हस्ते ‘विसावा पॅलेस‘ येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थापक अनिल शेवाळकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘मनस्विनी’ या कादंबरीला मिळालेला हा ‘पाचवा’ पुरस्कार.
‘स्व.बाबासाहेब के. नारखेडे, श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ’ यांचा ‘पंजाबची वाघीण ‘ बीबी गुलाब कौर या कादंबरीला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २१ सप्टेंबर २०२४ ला प्राप्त झाला. प्रमुख अतिथी डॉ. दिलीप देशमुख ( विज्ञान विभाग प्रमुख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे) यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.