पुणे-बंगळुरू बायपाससाठी 300 कोटी रुपये मंजूर:चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

2 hours ago 2
पुणे-बंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सूचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविला असून तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट ( मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. गडकरी यांनी या सादरीकरणाची दखल घेत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत दोन्ही यंत्रणांनी कृती आराखडा तयार केला असून त्याला गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यता दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे-बेंगळुरू बायपासची वस्तुस्थिती - गेल्या पाच वर्षात सुमारे २० लाख वाहनांची वाढ. - पुण्यात २०१८ मध्ये पुण्याची वाहनसंख्या ५२ लाख होती, ती २०२४ मध्ये ७२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. - दररोज १३०० नवीन वाहनांची भर पडते, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. - पुण्याला नसणारे रिंग रोड नसल्याने पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून करण्यात येतो. - पुणे-बेंगळुरू रस्ता सध्या जरी बायपास म्हणून असला तरी तो सोलापूर, सासवड, सातारा, मुंबईकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता रिंग रोड म्हणून वापरला जातो. - या बासपायची निर्मीती १९९४ मध्ये दोन लेनचा हायवे म्हणून करण्यात आली होती. - हा बायपास २००० मध्ये दोन लेनचा रस्ता वाढवून चार लेनचा करण्यात आला. - तसेच २०१० मध्ये सहा लेनचा रस्ता प्रस्तावीत झाला असून या सहा लेनची कामे अजून ही काही ठिकाणी प्रगती पथावर आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article