सोलापुरात राष्ट्रवादीत गटबाजी, अजित पवार संतापले, मोहोळमध्ये नेमकी राजकीय स्थिती काय?

2 hours ago 2

सोलापुरात राष्ट्रवादीत गटबाजी, अजित पवार संतापले, मोहोळमध्ये नेमकी राजकीय स्थिती काय?Image Credit source: TV9 NEWS NETWORK

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच पक्षातील गटबाजी समोर आलीय. अनगर अप्पर तहसील कार्यालयावरुन अजित पवार गटात वाद निर्माण झालाय. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी अनगर अप्पर कार्यालयावरुन मोहोळ बंदची हाक दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी राजन पाटील आणि आमदार यशवंत मानेंवर देखील टीकास्त्र डागलं. राजन तेरी खैर नाही, दादा तुमसे बैर नही, अशी टीका उमेश पाटलांनी केली. यानंतर भर कार्यक्रमात आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील यांची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली. विरोधकांबरोबर संधान साधून राजन आमच्याबाबत खालच्या भाषेचा वापर, अशी तक्रार त्यांनी केली होती. एवढंच नव्हे उमेश पाटलांनी ऑगस्टमध्ये अनगर अप्पर कार्यालय तहसीलविरोधात काढलेल्या मोर्चात देखील यशवंत मानेंवर शरसंधान साधलं होतं. दरम्यान उमेश पाटलांनी घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांकडून देखील इशारा देण्यात आला आहे.

सोलापूरच्या सभेतून अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटलांवर टीकास्त्र डागलंय. अजित पवारांचा दौरा रद्द करण्याची कोणामध्ये ताकद नसल्याचं म्हणत अजित पवारांनी चांगलंच सुनावलंय. दरम्यान ज्या अप्पर तहसील कार्यालयावरुन राष्ट्रवादीत गटबाजी निर्माण झालीय तो वाद नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरुन वाद काय?

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय राधाकृष्ण विखे-पाटलांनी मंजूर केलं होतं. त्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनगर अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात आलंय. 13 सप्टेंबरपासून अनगर अप्पर तहसील कार्यालयात कामकाजाला सुरुवात झालीय. माजी आमदार राजन पाटलांचं गाव असणाऱ्या अनगरमध्ये अप्पर तहसील कार्यालयाची निर्मीती झाली.

माजी आमदार राजन पाटलांनी हुकूमशाही पद्धतीनं अप्पर तहसील कार्यालय अनगरमध्ये नेल्याचा मोहोळ संघर्ष समितीचा आरोप आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं, अशी मोहोळ बचाव संघर्ष समितीची मागणी आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या बाजूने होती.

अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटलांकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आली. अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, अनगर अप्पर कार्यालयाला विरोध का होतोय? त्यावर देखील एक नजर टाकुयात.

अनगर अप्पर कार्यालयाला विरोध का?

मोहोळच्या दक्षिण भागातील मध्यवर्ती असणाऱ्या बेगमपूर अथवा कुरुल या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय व्हावे अशी नागरिकांची मागणी होती. पण हे अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे मंजूर झालंय. अनगर येथील मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या योग्य नसून मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी हे गैरसोयीचे आहे. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये या निर्णयावरून नाराजी आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून देखील या अप्पर तहसील कार्यालयाला विरोध केला जातोय. प्रणिती शिंदेंनी देखील मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. त्यामुळे या अप्पर कार्यालायाचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये मोहोळ विधानसभेत कशी लढत झाली होती?

2019 मध्ये मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादीचे यशवंत माने आणि शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर हे आमनेसामने होते. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 90 हजार 532 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या नागनाथ क्षीरसागर यांना 68 हजार 68 हजार 833 मतं मिळाली होती. या निवडणुकीत क्षीरसागर यांचा पराभव झाला होता.

मोहोळ विधानसभेत सद्या स्थिती कशी?

दरम्यान, मोहोळची सद्यस्थिती बघितली तर राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आलीय. मोहोळमधून यशवंत माने पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिंदे गटाचे सोमेश क्षीरसागर हे शिंदे गटातून मविआत जाण्याची शक्यता आहे. सोमेश क्षीरसागरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, सोमेश क्षीरसागर ठाकरे गटात गेल्यास मोहोळमध्ये सोमेश क्षीरसागर आणि यशवंत मानेंमध्ये सामना रंगू शकतो.

मोहोळमध्ये अजित पवार गटात वाद निर्माण झालाय. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी त्यांचेच आजी-माजी आमदारांविरोधात मोर्चा उघडला आहे. दरम्यान, उमेश पाटलांनी केलेल्या टीकेनंतर दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी देखील उमेश पाटलांना इशारा दिलाय.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article