मुंब्य्रात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

2 hours ago 2

Published on

22 Sep 2024, 6:25 pm

Updated on

22 Sep 2024, 6:25 pm

ठाणे : मुंब्य्राच्या जीवनबाग येथील बानू टॉवर या 30 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून घरात असलेली ५ वर्षाच्या चिमुरडीचा रविवारी (दि.22) मृत्यू झाला आहे. उनेजा शेख असे मृत मुलीचे नाव आहे. तर या घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी आपत्ती विभागाने धाव घेत ही इमारत रिकामी करून सील करण्यात आली आहे.

मुंब्य्रातील जीवनबाग परिसरातील बानु टॉवर बी विंगमधील 5 मजली इमारत 30 वर्षे जुनी आहे. रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. यावेळी घरात असलेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला तर घरातील इतर 3 जण किरकोळ जखमी झाले. उनेजा शेखला रुगणालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इतर तिघांमध्ये उमर शेख (23 वर्षे), मुस्कान शेख (21 वर्षे) आणि इजान शेख (01 वर्षे ) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मुंब्रा पोलीस सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित दाखल झाले. या इमारतीमध्ये एकूण 20 सदनिका व 06 गाळे असून या इमारतीचा समावेश सी 2 बी या धोकादायक श्रेणीत करण्यात आला होता. त्यामुळे इमारतीमधील रहिवाश्यांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत सदरची सदनिका रिकामी करून सिल करण्यात आल्या असून त्यानुसार उर्वरित कार्यवाही बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती ठामपा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article