मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीत वीज वाहिनीच्या धक्क्यात दोन जणांचा मृत्यू:झेंडा फडकवतांना तारेला धक्का लागल्याने घडली घटना

2 hours ago 2
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकावणाऱ्या दोन तरुणांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात घडली. अभय वाघमारे (वय १७), झकी बिलाल शेख (वय ३०) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात रविवारी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. साडेदहाच्या सुमारास वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात मिरवणूक आली. त्यावेळी काही तरुण हातात झेंडा घेऊन ध्वनिक्षेपकावर थांबले होते. अभय वाघमारे आणि काही तरुण झेंडा फडकावत होते. लोखंडी गजाला झेंडा लावण्यात आला होता. झेंडा फडकाविताना झेंड्याचा धक्का उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीला लागला. विजेच्या धक्क्याने वाघमारे खाली कोसळला. शेख यालाही विजेचा धक्का बसला. मिरवणुकीत दोन तरुणांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळताच मिरवणुकीत गोंधळ उडाला. वाघमारे आणि शेख यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. उच्चदाबाची वीजवाहिनी उंचावर होते. लोखंडी गजाला झेंडा लावण्यात आला होता. गजाचा स्पर्श वाहिनीला झाल्यानंतर दुर्घटना घडली. चंदननगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पीएमपी चालकाकडून तरूणाीचा विनयभंग पीएमपी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या तरूणीचा चालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात पीएमपी चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश कांबळे (३०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी दररोज पाषाण येथील सोमेश्वरवाडी ते ग्रीन पार्क दरम्यान प्रवास करते. प्रवासादरम्यान आरोपी पीएमपी चालक कांबळेने तिच्याशी ओळख करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला प्रतिसाद दिला नाही. कांबळेने तिच्याकडे मोबाइल क्रमांक मागितला. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला त्रास दिला, असे फिर्यादीत सांगितले आहे. चतु:शृंगी पोलिसांनी कांबळेला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article